Testimonial

 
testimonial

महादेव पाटील (ऑटो रिक्षा चालक, श्रीनगर, निपाणी)

संकपाळ साहेब आपल्या सल्ल्याने केलेल्या LIC पॉलिसीची रक्कम आज जमा झाली मला माहीतही नव्हतं कि 2020 या साली कोरोना सारखा भयानक रोगाची साथ येऊन संपूर्ण देश लॉकडाऊन होईल सर्व व्यवसाय बंद होतील व जनतेच जगणं मुस्कील होईल असेच माझंही झाले होते अचानक मोबाईलची मॅसेज रिंग वाजली पाहतो तर LIC ची रक्कम माझ्या खात्यात जमा झाली होती मी लगेच मनोमनी तुमचं व LIC चे आभार मानले आणि तुम्हाला फोन केला खरोखरच तुम्ही दिलेल्या सल्ल्याने व LIC च्या साथीने माझं कुटुंबातील सदस्य आनंदित झाले म्हणूनच म्हणावेसे वाटते. दिवा म्हणे ज्योतीला सांगा मानव जातीला सुखा सोबत दुःखातही LIC व संकपाळ साहेब आहेत आमच्या साथीला असेच सहकार्य आमच्या कुटुंबावर व सर्व जनतेवर तुमचं व LIC चे सदैव राहो. धन्यवाद !  महादेव पाटील, निपाणी.
testimonial

पांडुरंग रामचंद्र मिरजे (बिरदेवनगर ,यरनाळ रोड-निपाणी)

आनंद संकपाळ व चंद्रकला संकपाळ यांचे विमा सेवेला विस वर्षे पूर्ण झाली आहेत याबद्दल अभिनंदन ! 
                 माझ्या दोन्ही मुलांची सागर व सारंग इंजिनिअरिंग साठी निवड झाली होती आणि प्रवेश अर्जासह 80,000 फी कॉलेजला भरावी लागत होती.त्याचीच जोडणी करणे साठी मॅडम व मी अनेक वेळा बँक ऑफ महाराष्ट्र , बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये गेलो होतो. तेथील मॅनेजरने कर्ज देतो म्हणून सांगितले होते. आणि ज्या दिवशी कर्ज द्यायचे होते त्यादिवशी मॅनेजर रजेवर होते आणि आम्ही असेच बँकेच्या दारात कट्ट्यावर बसलो होतो तेवढ्यात आमच्या समोर सायकलवरुन आनंद संकपाळ आले व आम्हाला बघुन थांबले व विचारपुस केली तेंव्हा त्यांना आम्ही सर्व सत्यकथन केले.तेव्हा त्यांनी सर्व कागदपत्रे पाहिली व आम्हाला एलआयसी ऑफिसला घेऊन गेले व तासाभरात 85,000 हजारांचा डी.डी.दिला.ते काय करणार कसं कर्ज देणारं हे काय समजत नव्हते पण त्यांनी सांगितले नोकरीला लागले तेव्हा कर वाचतो म्हणून मॅडमनी 180 रुपये दरमहाची विमा योजना घेतली होती ती योजना बरीच वर्षे सुरु होती त्यावर लगेच कर्ज मंजूर करून त्याचा डीडी दिला.आम्हाला त्याच दिवशी रक्कम रोख मिळाली व मुलांच्या प्रवेशाचे काम झाले.नंतर काही वर्षांत ते कर्ज फिटले व आम्हाला त्या पॉलिसीची मॅच्युरिटी तीन लाख 85 हजार खात्यावर मिळाली.हे सर्व काम आनंद संकपाळ यांनी केले. असा विमा योजना बचतीचा लाभ होतो.म्हणुन मुलं लहान असताना विमा योजना घेणे आवश्यक आहे.
            योग्य नियोजन करणे साठी आनंद संकपाळ व चंद्रकला संकपाळ यांना त्यांच्या "विमा समाधान" या नवीन कार्यालयात भेट घेणे फायदेशीर आहे. संकपाळ यांचे विमा सेवा कार्याला विस वर्षे पूर्ण झाली आहेत याबद्दल पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
testimonial

सौ.वैजयंता निवृत्ती चव्हाण (शनिमंदिर जवळ,आरोरा मागे, निपाणी.)

आदरणीय मॅनेजर साहेब, भारतीय जीवन विमा निगम, नमस्कार... आनंद संकपाळ सर व चंद्रकला संकपाळ मॅडम यांनी जे आमच्या साठी कष्ट घेतले ते आम्ही जन्मभर विसरणार नाही. माझे पतीचा सहा वर्षापुर्वी नवरात्र घटस्थापना दिवशी निपाणी हायवे रस्त्यावर मोठा अपघात झाला होता.अनेक शस्त्रक्रिया करून चार महिने कोमात स्मृतीभ्रंश झालेला.ते कोणालाही ओळखत नव्हते.जगणं मुष्किल बणले होते.लहाण मुलं व म्हातारे सासुसासरे राबुण घरखर्च चालवणारा नवरा आजारी आणि औषधांचा खर्च न झेपणारा अशा कठीण परिस्थितीत जीवन जगण्याची इच्छा संपत चालली होती.तेव्हा आनंद संकपाळ व चंद्रकला संकपाळ या दादा वहिनी यांनी जे सहकार्य केले त्या मुळेच आज आम्ही आहे. माझे पती निवृत्ती पांडुरंग चव्हाण यांनी अपघात होण्याच्या आधी दोन वर्षे संकपाळ यांचे कडे विमा पॉलिसी काढली होती.अपघातानंतर हप्ता भरणे शक्य नव्हते म्हणून बंद पडली.पण संकपाळ सरांनी आम्हाला विमा हप्ता दहा वर्षे माफ करुन दिला व दरमहा पेन्शन सुरू केली त्या मुळेच गेली सहा वर्षे पतीच्या औषधांचा व मुला-मुलींच्या शाळेच्या खर्चाची सोय झाली आहे. माझ्या पतीच्या अपघाती अपंगत्वाचा लाभ एलआयसी कडून आम्हाला मिळवुन दिल्या बद्दल आमचे सर्व चव्हाण कुटुंबीय आनंद संकपाळ व चंद्रकला संकपाळ यांचे खुप खुप आभार मानते. घरात कमाई करुन आणणारा नवरा किंवा बायको यांचा विमा आनंद संकपाळ यांचे कडे करुण घेणे महत्त्वाचे आहे. आता माझ्या पतीची विमा योजना हप्ता न भरता सुरू आहे.म्हणुन संकपाळ यांचे बेळगाव नाका,निपाणी येथील आनंद एलआयसी ऑफिस या सेवा केंद्राला आमच्या शुभेच्छा! 
testimonial

प्रा.जे.डी.कांबळे (समाजशास्त्राचे अभ्यासक, निपाणी.)

निपाणी आणि निपाणी परिसरात आनंद संकपाळ व त्यांच्या पत्नी चंद्रकला संकपाळ कुटुंबाचे आर्थिक नियोजन आणि विकास या क्षेत्रात एलआयसीच्या माध्यमातून जे भरीव काम करीत आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ज्यांनी एलआयसी मध्ये गुंतवणुकी केल्या त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक लाभ तर झालेच पण त्याच बरोबर कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाची संकल्पनाही स्पष्टपणे समजली.मला स्वतः ला आनंद संकपाळ व त्यांच्या मार्गदर्शनाचा खुप लाभ झालेला आहे. इच्छुक गुंतवणूकदारांनी आनंद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाचा व प्रत्यक्ष सेवेचा लाभ घ्यावा असे मला मनापासून वाटते.
testimonial

आनंदाची सोबती -सौ. चंद्रकला संकपाळ

 

                            बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळच्या यरनाळ या गावी आनंद मारुती संकपाळ यांच्याशी लग्न करून 25 जून 2000 या दिवशी मी आले.माझे सासु ,सासरे हे अतिशय कष्टाळू व प्रामाणिक त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे माझे पती आनंद... अतिशय कष्टाने व प्रामाणिकपणाने "कमवा व शिका" योजनेतून शिकलेले.
                            माझे पती आनंद हे एम. ए. बी. एड्. एम. फिल.सी.जे. केले होते आणि निपाणी येथील के.एल.ई.जी.आय.बागेवाडी कॉलेज व चिकोडी येथील बसव प्रभू कोरे व अर्जुन नगर येथील देवचंद कॉलेज मध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक होते.तीन कॉलेजवर शिकवुन दोन हजार तेही नियमितपणे नव्हते. नोकरी आणि पगार फारच कमी त्या मुळेच अजून एक मार्ग आम्ही शोधत होतो. विरेश्वर मध्ये नोकरी आली होती मात्र जमलं नाही. आणि 25 एप्रिल 2000 मध्ये मुलगी अमृता जन्मली.चिकोडी होऊन येताना आमच्या सरांना बस मध्ये शेट्टी साहेब भेटले व त्यांनी भेटायला येण्यास सांगितले. आम्ही दोघे साहेबांना भेटायला गेलो तेव्हा एजंटांना त्यांच्या कामगिरीबद्दल बक्षीस वाटप कार्यक्रम सुरू होता  हे सर्व पाहून आम्ही भारावून गेलो व नंतर साहेबांनी आमची कागदपत्र घेऊन काही फॉर्मवर सह्या घेतल्या व बेळगाव ला एक महिन्याच्या ट्रेनिंग साठी जायला सांगितलं.
           अमृता सहा महिन्याची होती तिला घरी सोडून आम्ही बेळगावला गेलो तेथील प्रशिक्षणात फक्त मला प्रवेश मिळाला व आमच्या सरांना बाहेर थांबावे लागले. मग ते सकाळी मला बसला बसवत व रात्री आठ नऊ वाजता घ्यायला बस स्टॅन्ड वर येत असे एक महिना सुरू होते आणि मला विमा एजन्सीचे लायसन मिळाले 13 मार्च 2002 रोजी माहिती 18 मार्च रोजी आम्हाला शेट्टी साहेबांनी काही पॉलिसीची माहिती दिली व विकण्यास सांगितले आमच्या गावातच आम्ही काही लोकांना विमा योजना विकल्या आणि मार्च पूर्ण झाल्यावर आम्हाला पहिल्यांदा 3 हजार रुपये चा चेक आला आणि आमच्या विमा प्रवासाची सुरुवात खूप छान झाली.
 2002-2003 हे आर्थिक वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं शेखर शेट्टी व चिकोडी शाखेचे मॅनेजर कत्ती साहेब यांचे मार्गदर्शन व त्यावेळेला मिळालेले राजेश टागोर यांचे ट्रेनिंग आम्हाला खूप लाभदायक झाले.
व आमची विमा एजन्सी धावू लागली.
 माझे पती आनंद संकपाळ हे तीन कॉलेज वर नोकरी करत होते पण ते अर्धवेळ कमी पगारात त्यांनी त्यांच्या ओळखीने खूप लोकांना विमा योजना विकल्या आणि आम्ही शतकवीर झालो, करोडपती झालो.
 आम्ही आमच्या परिवारात 2003 -04 या आर्थिक वर्षात पहिली मोटरसायकल घेतली. आणि कामाला अजून गती आली.
24 जुलै 2004 मध्ये अभिषेक जन्मला आणि अजून आमच्या कामातला उत्साह वाढला.
2004 मध्ये आम्ही पहिला सोनीचा मोबाईल घेतला.
2005 मध्ये जानेवारी महिन्यात 55 जीवन आनंद विकल्या.
2006 निपाणी येथे विमा सेवा केंद्र सुरू केले.
25 डिसेंबर 2006 रोजी आमच्या यरनाळ येथील जीवन आनंद या नूतन वास्तूत प्रवेश केला.
2006 विमा ग्राम-यरनाळ झाले.
2007 चिक्कोडी शाखेमध्ये सर्वोत्तम विमा विक्री केली.
2008 मध्ये निपाणी येथे सॅटॅलाइट ऑफिस सुरू झाले.
17 जुलै 2008 नवीन विमा एजन्सी घेतली.
2009 पहिली माझी एमडीआरटी झाली.
2010 यरनाळ येथे नवीन शेती घेतली.
2011 शेतावर वृक्षारोपण केले "जिथे होती झाडे जमा वृक्ष म्हणजे शेतीचा विमा"  झोनल मॅनेजर कडून सन्मान व तिरुपती बालाजी येथे प्रशिक्षण झाले.
2012 निपाणी येथे हप्ता भरणा केंद्र सुरू केले.
2013 आम्ही स्वतः ची नवीन कार घेतली.
2014 आम्ही दोघे हैदराबाद येथे झोनल प्रशिक्षण केले.
2015 आम्ही आनंद ऑफिस साठी माळी कॉम्प्लेक्स येथे गाळा खरेदी केला व स्वतःच्या जागेत ऑफिस सुरू केले.
2016 निपाणी व चिकोडी शाखेत प्रिमीयममध्ये प्रथम
2017 चिकोडी च्या इतिहासात पहिल्यांदा प्रीमियम मधून करोडपती माझे पती करोडपती झाले.
2018 आनंद चे पहिले एम डी आर टी झाले.
2019 गुरगाव येथे प्रशिक्षणासाठी विमानाने प्रवास झाला.
2020 आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण घेतले.
2021 विमा समाधान हे नवीन ऑफिस सुरू केले.
2022 आमच्या दोघांचे चेअरमन क्लब मेंबर सातत्य ठेवून 2022 चा एम डी आर टी आंतरराष्ट्रीय अमेरिकेच्या विमा प्रतिनिधी मिटींगला जाण्याची पात्रता सिद्ध झाली.
  आम्ही दोघे सतत आणि अथक गेल्या 21 वर्षांपासून विमा सेवक म्हणून काम करत आहे याला हजारो ग्राहकांचे आशीर्वाद मिळाले आहेत याबद्दल मी चंद्रकला आनंद संकपाळ माझे हितचिंतक ग्राहक आणि नातेवाईक आमचे गुरुवर्य शेखर शेट्टी साहेब आमचे मॅनेजर संजय कदम साहेब आणि समस्त निपाणी परिसरातील हितचिंतक या सर्वांना शतकोटी नमन करून अंतकरणापासून आभार मानते धन्यवाद.

testimonial

Dr.Rajesh Banavanna

Dear Anand and Mrs.Chandrakala  Hearty congratulations for 20th anniversary of your LIC office. It’s very proud  to see you at this esteem level of your carrier. It’s not surprise for me to see you at this level because we have witnessed your dedication and sincerity in the work. Your strong will to make people secured by having LIC policy is amazing. We could see that you are emotionally attached to your clients gives them lot of comfort and confidence. Most important your humbleness and prompt service is very admirable. I wish you will reach out to the maximum people and convince them the importance of LIC.  Our best wishes are always with both of you.